This is a Marathi version of the press release issued on 17 January 2022.
कृपया प्रसिद्धीसाठी
मा. संपादक, दै. ……….
शेतीमालावर लादलेली वायदे बाजारावरील बंदी हटवा व जि.एम तंत्रज्ञानाला परवानगी द्या
- अनिल घनवट
या वर्षी काही शेतीमालाला चांगले दर मिळू लागताच सरकारने वायदे बाजारात हस्तक्षेप करून काही शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. बि.टी. वांग्याला बंदी घलून तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाकारले आहे. याच्या विरोधात शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष सत्याग्रह करणार असल्याची माहिती अनिल घनवट यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. परिणामी सोयाबीनला चांगले दर मिळत होते. मात्र पोल्ट्री उद्योजकांच्या दबावामुळे सरकारने सेबी (SEBI) मार्फत सोयाबीन सहित इतर आठ शेती मालांच्या वायदे बाजारावर बंदी घतली आहे. शेतकर्यांना दिन पैसे नफा मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली की सरकार नेहमीच अशा प्रकारे शेती व्यापारामध्ये हस्तक्षेप करून भाव पाडते. आता टेक्सटाईल लॉबी कपाशीचे दर पाडणयासाठी सक्रीय झाली आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी अनिल घनवट यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र दिले आहे.
जगभर जनुक अभियांत्रिकी ( जी. एम.) तंत्रज्ञानाला मान्यता मिळाली असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे मात्र भरतात या तंत्रज्ञानाला बंदी घातली आहे. जी. एम. तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या पिकांच्या चाचणया घेऊन मान्यता देण्यासाठी असलेली सरकारी संस्था जी.ई.ए.सी. ने भारतात तयार केलेल्या बी.टी. वांग्याच्या चाचण्या घेऊन ते पर्यावरण, जनावरे व मणुष्यास हानीकारक नसल्याचा निर्वाळा देत मान्यता दिली होती. मात्र काही गटांच्या दबावाला बळी पडून २०१० मध्ये बी. टी. वांग्या च्या चाचण्या व पीक घेण्यास बंदी घातली आहे. शेतकरी संघटनेने अनेक वेळा विनंती करून ही सरकार बंदी हटवायला तयार नाही. सरकारच्या या आडमुठ्या भुमिकेच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना, कायदे भंग करून सत्याग्रह करणार आहे. सरकारने ही बंदी न हटविल्यास दि. १७ फेब्रुवारी रोजी अनिल घनवट यांच्या शेतात बी. टी. वांग्याची लागवड करणार आहे अशी माहिती अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेती सुधारणां बाबत स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने एक खुले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असल्याचे ही घनवट यांनी सांगितले. या प्रसंगी अनिल चव्हाण, सीमाताई नरोडे, लक्षमण रांजणे, धनाजी धुमाळ उपस्थित होते.
दि. १७/०१/२०२२
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.