Press release in Marathi: Launch of the Feed India movement and release of the Feed India paper
कृपया प्रसिद्धीसाठी
मा. संपादक, दै………
*प्रतिबंधित बी टी वंग्याची लागवड करून शेतकरी संघटनेने केला किसान सत्याग्रह*
सरकारने जी एम पिकांना परवानगी द्यावी ही मागणी करत शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने श्रीगोंदा फॅक्टरी येथे प्रतिबंधित बी टी वांग्याची जाहीर लागवड करून सविनय कायदेभंग करत किसान सत्याग्रह केला. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
जगभर जनुक सुधारित पिकांना, जेनिटिकली मॉडिफाईड (जी एम) वाणांना मान्यता देण्यात आली आहे मात्र भारतात फक्त कपाशीच्या बोलगार्ड १ व बोलगर्ड २ या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना व कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंडअळी रोधक जातींना मान्यता नाही. इतर ही पिकां मध्ये ही उत्पादन वाढवणार्या, पण्याचा ताण सहन करणार्या, खारवट जमिनीत येणार्या व अधिक सकस अन्न देणार्या जाती तयार आहेत. त्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकविल्या जातात व तेथील शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत.
बी टी वांग्याचे बियाणे भारतातील कंपनीने, एका कृषी विद्यापिठाच्या सहकार्याने तयार केले आहे. भरतात या बियाण्याला बंदी आहे मात्र बांगला देशाने सात वर्षा पुर्वी मान्यता दिली व तेथील शेतकरी फायदा कमवत आहे. ही बंदी मोडून काढणयासाठी हा सविनय कायदे भंग आहे. या पुर्वी अकोला जिल्हयात, तणनाशक रोधक कपाशीची लागवड करून किसान सत्याग्रह केला होता.
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात बी टी वांग्याची लागवड करण्याचे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शेतकर्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
या प्रसंगी भाषण करताना सीमा नरोडे यांनी जी एम पिकांमुळे महिलांचे श्रम कमी होतात व आरोग्य चांगले रहाते असे सांगितले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, ललित बहाळे यांनी जी एम ही उद्याची शेती आहे व हा लढा स्वातंत्र्याचा आहे असे सांगितले. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी हा लढा दिल्ली पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकर्यांनी दिल्लीला धडक द्यायची आहे. बी टी वांग्या बरोबर सर्व जी एम पिके घेण्याचे स्वातंत्र्य शेतकर्यांना मिळाल्यास शेतकर्यांना फायदा, ग्राहकांना रास्त दरात अन्न मिळेल व देश समृद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी रामजिवन बोंदर, सतीष दाणी, सुधीर बिंदू, मधूसूदन हरणे, विजय निवल यांनी मार्गदर्शन केले. किसान सत्याग्रहामध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१७/०२/२०२२
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.